जालना,दि.30(जिमाका): सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जालना यांच्या
वतीने ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत जालना जिल्ह्यात विविध आरोग्यविषयक उपक्रम
राबविण्यात येत आहेत. या अभियानाच्या माध्यमातून आरोग्य, लसीकरण, मातृ आरोग्य,
पोषण तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये
जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात 17
सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’
राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत जिल्ह्यात विविध आरोग्य विषयक उपक्रम घेण्यात
येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात शाळा तसेच आरोग्य केंद्रांमध्ये विविध
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दासला येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. हिना नवाब आणि डॉ. बिलाल यांच्या
मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. या उपक्रमात पाचवी ते
दहावीच्या विद्यार्थ्यांना टीडी (Td) लस देण्यात आली.
यामध्ये ८४ मुला-मुलींना टीडी लसीचा लाभ मिळाला.
किशोरवयीन विद्यार्थ्यांना आवश्यक लसीकरण करून घेण्याबाबत यावेळी मार्गदर्शन
करण्यात आले.
तसेच सावंगी येथील एएनसी (ANC) क्लिनिकमध्ये गर्भवती महिलांची तपासणी व आरोग्यविषयक
मार्गदर्शन करण्यात आले. गर्भावस्थेतील महिलांना सकस आहार, पौष्टिक अन्न, आरोग्य व
स्वच्छता याबाबत माहिती देण्यात आली. तसेच गर्भावस्थेत तंबाखूजन्य पदार्थांपासून
दूर राहण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. ग्रामीण आणि दुर्गम भागातील गर्भवती महिलांना
आरोग्य सेवा सहज उपलब्ध होण्यासाठी अशा आरोग्यविषयक उपक्रमांचा उपयोग होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभारझरी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा
परिषद शाळा अंबा येथे एचपीव्ही (HPV)
लसीकरणाबाबत माहिती व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी
विद्यार्थ्यांना एचपीव्ही विषाणूमुळे होणारे आजार, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग
आणि त्याच्या प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली.
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी
असलेले गैरसमज दूर करून ‘प्रतिबंध हाच
उपचारापेक्षा उत्तम मार्ग’ हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत
पोहोचविण्यात आला. कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची
माहिती देत आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यात आली.
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून केवळ
उपचारांवर भर न देता प्रतिबंधात्मक
आरोग्यसेवा आणि जनजागृती यांना प्राधान्य दिले जात आहे.
शाळांमधील विद्यार्थ्यांचे लसीकरण, किशोरवयीन मुला-मुलींमध्ये आरोग्यविषयक
जागरूकता, गर्भवती महिलांचे समुपदेशन आणि कर्करोग प्रतिबंधाबाबत माहिती अशा विविध
उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील आरोग्यविषयक जागरूकता होत आहे.
****
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment