जालना दि.28
(जिमाका) :महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता
विभागाच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा
कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना व मॉडेल करिअर सेंटर, जालना यांच्या वतीने विविध ठिकाणी जिल्ह्यात 29 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात
आलेला ‘पंडित
दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’ स्थगित करण्यात आले होते.
छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026 ची आदर्श
आचारसंहिता लागू झाल्यामुळे दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी नियोजित रोजगार महाकुंभाचे
आयोजन स्थगित करण्यात आले आहे. या रोजगार महाकुंभाची नवीन तारीख व कार्यक्रमाची माहिती योग्य वेळी
प्रसिध्दी माध्यमांद्वारे जाहीर करण्यात येईल.
तरी सर्व रोजगार इच्छुक युवक – युवती, नोकरी इच्छुक उमेदवार, नियोक्ते,
औद्योगिक आस्थापना तसेच संबंधित घटकांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment