जालना,दि.30
(जिमाका) : जालना जिल्ह्यातील रेशीम
उद्योगाचा सर्वांगीण विकास करण्यासह रेशीम उत्पादनाचे मूल्यवर्धन अधिक सक्षम करणे
आणि युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने
एकात्मिक कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत रेशीम
उत्पादनापासून त्यावरील प्रक्रिया, विणकाम, मूल्यवर्धन आणि तयार उत्पादन
निर्मितीपर्यंत आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी
कौशल्य प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.
या उपक्रमांतर्गत सिल्क
रिलिंग टेक्निशियन, सिल्क ट्विस्टिंग टेक्निशियन, सिल्क डायिंग अँड प्रोसेसिंग ऑपरेटर,
सिल्क वॉर्पिंग अँड सिल्क वेफ्टिंग टेक्निशियन, सिल्क विव्हिंग अँड लूम ऑपरेटर,
सिल्क व्हॅलू ॲडिटियन अँड स्किल अपग्रेडेशन स्पेशालिस्ट आणि सिल्क प्रॉडक्ट
डेव्हलपमेंट या सात अभ्यासक्रमांसाठी पात्र प्रशिक्षण भागीदार व संस्थांकडून
प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. रेशीम क्षेत्रातील अनुभव, औद्योगिक क्षेत्राशी
असलेली संलग्नता, रोजगाराशी संबंधित जोडणी तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या
उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता असलेल्या पात्र संस्थांनी
प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
इच्छुक
पात्र संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह https://short.do/2Bm9xl
परिशिष्ट 1 ते 10
मध्ये दिलेल्या नमुन्यानुसार दोन प्रतींमध्ये आपले प्रस्ताव दि. 29 ऑक्टोबर 2026
ते 2 नोव्हेंबर 2026 या कालावधीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना येथे ऑफलाइन
पद्धतीने सादर करावेत. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा दूरध्वनी
क्रमांक 02482-299033 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment