जालना
,दि. 1 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने 05- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक
-2026 साठी कार्यक्रम दि.22 सप्टेंबर 2026 रोजी घोषित केला आहे. जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या
दृष्टीकोनातुन निवडणुक घोषित झाल्यापासुन निवडणुक निकाल घोषित होईपर्यत, परवाना
दिलेले शस्त्रास्त्रे वाहुन नेण्यावर व बाळगण्यास निर्बंध लागू करण्यात येत आहेत.
तरी असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आहेत.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये शासकीय
कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती, दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी, पोलिस
अधिकारी-कर्मचारी, बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी-कर्मचारी तसेच सराफा
यांच्या व्यतिरिक्त तसेच मा. उच्च न्यायालयातील जुन्या रिट पिटीशन 2009/2014 च्या
आदेशास अधीन राहुन इतर सर्व परवानाधारक व्यक्तींनी परवाना दिलेले शस्ञास्ञे वाहुन
नेण्यावर व बाळगण्यास आदेशान्वये बंदी घालण्यात आली आहे. शस्त्र परवानाधारकांनी
आपले शस्ञ जवळच्या पोलिस ठाण्यात जमा करावेत. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर
एका आठवड्याचे आत संबधितांचे शस्ञे परत करण्यात यावेत. असेही आदेशात नमुद करण्यात
आले आहे. हे आदेश दि. 30 सप्टेंबर, 2026 ते दि. 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत संपूर्ण
जिल्हा हद्दीत लागु राहतील.
*****
No comments:
Post a Comment