जालना,दि.
1 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने 05- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक
-2026 साठी कार्यक्रम दि.22 सप्टेंबर 2026 रोजी घोषित केला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम
163 अन्वये कोणत्याही वाहनाच्या ताफ्यामध्ये दहापेक्षा अधिक मोटार गाड्या अथवा
वाहने वापरण्यास निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.
असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आहेत.
निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार
संहिता अंमलात आलेली आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या निर्देशानुसार कोणत्याही
परिस्थितीत सुरक्षेसाठी अ
सलेल्या मोटार गाड्या, वाहने यांच्या ताफ्यात दहा पेक्षा अधिक
वाहने नसावीत असे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार
पाडण्याच्या दृष्टीकोनातुन कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या
उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहा पेक्षा अधिक मोटार गाड्या,
वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. निवडणुक
प्रचार फेरी / मिरवणुकामध्ये जास्तीत जास्त 10 वाहने वापरता येतील.
******
No comments:
Post a Comment