जालना,दि.2(जिमाका)
: दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अडचणीत
आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी
जिल्ह्यातील 860 गावांमध्ये ‘शेतकरी संवाद सभा’ घेण्यात आल्या. जिल्हाधिकारी आशिमा
मित्तल यांच्या सूचनेनुसार राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून प्रशासनाने गावपातळीवर
शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला.
दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या
विविध समस्यांची माहिती घेण्यासोबतच शासनाच्या मदत व कल्याणकारी योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत
पोहोचविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तहसीलदार,
तालुका कृषी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी नियोजन करून या सभा घेतल्या.
सभांमध्ये शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई, चारा उपलब्धता तसेच दुष्काळाच्या
पार्श्वभूमीवर शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर
शेतकऱ्यांच्या अडचणी, स्थानिक गरजा आणि प्रलंबित प्रश्न जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी
त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली.
गावागावांत एकाचवेळी संवाद साधल्यामुळे जिल्ह्यातील
दुष्काळसदृश परिस्थितीचा आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांचा प्रशासनाला थेट आढावा घेता आला.
शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्या व सभांमधून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आवश्यक प्रशासकीय
कार्यवाही आणि उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
******

.jpeg)

No comments:
Post a Comment