जालना,दि.1 (जिमाका) : जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख,
जालना यांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणावर एकत्रीकरण व नगर भूमापनासंबंधित अपील
प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी लोकअदालतीचे
आयोजन करण्यात आले आहे.
कार्यालयाकडून निकाली काढण्यासाठी प्राप्त
झालेल्या अपील प्रकरणांबाबत सर्व संबंधितांना कळविण्यात आले आहे. त्यासाठी दि. 6 ऑक्टोबर 2026
रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, जालना यांच्या
कार्यालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
संबंधित प्रकरणांमध्ये अपीलदार, जबाबदार किंवा
मिळकतीच्या संदर्भात कोणाचा काही हितसंबंध असल्यास त्यांनी स्वतः किंवा कायदेशीर
प्रतिनिधीमार्फत लोकअदालतीस हजर राहावे. तसेच मिळकतीशी संबंधित कागदपत्रे व
पुराव्यांसह आपली बाजू मांडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.लोकअदालतीचे ठिकाण : जिल्हा
अधीक्षक भूमी अभिलेख, जालना यांचे कार्यालय सुनावणीची तारीख : 6 ऑक्टोबर 2026 वेळ : सकाळी 11 वाजता
संबंधित नागरिकांनी लोकअदालतीचा लाभ घेऊन प्रलंबित
प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा
अधीक्षक भूमी अभिलेख कृष्णकांत कणसे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
केले आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment