Thursday, 15 October 2026

इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनांसाठी 30 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत

 


जालना,दि.15 (जिमाका) : सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या जालना जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून त्याची प्रत संबंधित कार्यालयात सादर करावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना या योजनांसाठी पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.

शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी या योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत OBC, VJNT आणि SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना, तर पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत NT-C प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

या योजनांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर 2026 आहे. विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जालना यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment