जालना,दि.9(जिमाका) : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी
पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या युवकांसाठी मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी उपलब्ध
झाली आहे. सेवा निवड मंडळाच्या (SSB) परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व
प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे 19 ते 28 ऑक्टोबर 2026 या कालावधीत एसएसबी
अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांना मोफत प्रशिक्षणासह
निवास व भोजनाची सुविधाही देण्यात येणार आहे.
निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींनी केंद्रामध्ये पोहचण्यासाठी
दि. 18 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता प्रशिक्षण केंद्रात हजर रहावे.
जालना जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांची निवड करण्यासाठी
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे 15 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत
मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी केले
आहे.
पात्र
उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी Department of
Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील
DSW Portal मधील ‘Resources – PCTC Nashik – SSB 67’ या विभागातून प्रवेशपत्र डाउनलोड
करावे. संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून प्रवेशपत्राची प्रत मिळाल्यास तीही
सोबत आणावी. प्रवेशपत्रासोबत नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून मुलाखतीच्या
वेळी सादर करावीत.
या प्रशिक्षणासाठी पुढीलपैकी संबंधित
पात्रता असणे आवश्यक आहे.
CDSE-UPSC
किंवा NDA-UPSC परीक्षा उत्तीर्ण: कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन
(CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA-UPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन एसएसबी मुलाखतीसाठी
पात्र ठरलेले उमेदवार.
एनसीसी स्पेशल एन्ट्री: एसएसबी मुलाखतीसाठी
कॉल लेटर प्राप्त झालेले उमेदवार.
टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स: एसएसबी
मुलाखतीसाठी कॉल लेटर असलेले उमेदवार.
युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीम: एसएसबी
कॉल लेटर असलेले किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव
असलेले उमेदवार.
पात्र
उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी संबंधित पात्रतेची प्रमाणपत्रे व आवश्यक कागदपत्रे सोबत
आणावीत.
प्रशिक्षणाबाबत अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण
केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथील प्रभारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. ई-मेल :
training.pctcnashik@gmail.com. दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक
9156073306. भारतीय सैन्यदलात अधिकारी म्हणून करिअर घडवू इच्छिणाऱ्या पात्र युवकांनी
या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
केले आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment