Wednesday, 7 October 2026

इतर मागासवर्गीयांसाठी विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन


ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अनिवार्य; योजनांची व्यापक प्रसिद्धी करण्याचे आवाहन

 

जालना,दि.7 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत राज्यातील इतर मागासवर्गीय समाजाच्या कल्याण, विकास व उन्नतीसाठी विविध कर्ज व प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची पात्र लाभार्थ्यांनी  लाभ  घेण्याचे आवाहन महामंडळाच्या कार्यालयाने केले आहे.

महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, कौशल्य प्रशिक्षण विकास योजना, महिला स्वयं-सिद्धी व्याज परतावा योजना, बीजभांडवल योजना तसेच थेट कर्ज योजना अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह www.msobcfdc.org या वेब पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे. त्यामुळे इच्छुक लाभार्थ्यांनी संबंधित योजनेची माहिती घेऊन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.

या योजनांमुळे इतर मागासवर्गीय समाजातील युवक, महिला तसेच पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगार, शिक्षण, कौशल्यविकास आणि आर्थिक उन्नतीसाठी मदत मिळणार आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी उपलब्ध योजनांची माहिती घेऊन विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

****

No comments:

Post a Comment