जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती
बैठक संपन्न
जालना,दि.7(जिमाका):जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने
कठोर उपाययोजना कराव्यात, तसेच अंमली पदार्थांचे सेवन करणारे तसेच विक्री करणाऱ्या
दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.
जिल्हाधिकारी
कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती बैठकीत जिल्हाधिकारी
बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, राज्य उत्पादन शुल्क
अधिक्षक ज्ञानेश्वरी आहेर, उपविभागीय अधिकारी रामदास दौड, उपविभागीय पोलीस अधिकारी
अनंत कुलकर्णी सहाय्यक आयुक्त जीवन जाधव, सीजीएसटी अधिक्षक आनंद काकणे, जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, पोलीस निरिक्षक
पंकज जाधव यांची उपस्थिती होती. तर पोलीस अधिक्षक तेगबीर सिंह संधू यांच्यासह सर्व
उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हे ऑनलाईन बैठकीस उपस्थित होते.
यावेळी
जिल्हाधिकारी म्हणाल्या की, जिल्ह्यातील अंमली पदार्थांची उपलब्धता, विक्री व वाहतूक
रोखण्यासाठी पोलिस, महसूल, कृषी, अन्न व औषध प्रशासन, आरोग्य, शिक्षण या विभागांनी
समन्वयाने काम करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील
संशयास्पद ठिकाणे शोधन त्याठिकाणी
नियमित तपासणी करावी. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी प्रभावी गस्त वाढविणे तसेच
संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. शाळा-महाविद्यालयाच्या
शेजारील टपरी-दुकानामार्फत अंमली पदार्थांची विक्री किंवा तस्करी करणाऱ्या व्यक्ती
व घटकांची माहिती संकलित करून त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. नागरिकांनीही
अंमली पदार्थांच्या गैरव्यवहाराबाबत प्रशासनाला माहिती देऊन या मोहिमेत सक्रिय सहभाग
घ्यावा, असे आवाहन केले. अंमली पदार्थमुक्त जिल्हा निर्माण करण्यासाठी सर्व विभागांनी
जबाबदारीने आणि प्रभावीपणे कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
अंमली
पदार्थांच्या सेवनामुळे युवकांच्या आरोग्यावर तसेच त्यांच्या सामाजिक व कौटुंबीक जीवनावर
गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे शैक्षणिक संस्था, महाविद्यालये आणि युवकांमध्ये जनजागृती
करण्यावर भर देण्यात यावा. शाळा
आणि महाविद्यालयापुरतेच मर्यादित न राहता गावपातळीवर देखील अंमली पदार्थाच्या
सेवनाच्या दुष्परिणामाची व्यापक जनजागृती करावी. युवा पिढी हे देशाचे भविष्य आहे. त्यामुळे तरुणांना
व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. परंतु कुटुंब, शाळा,
महाविद्यालये आणि समाजाने देखील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल म्हणाल्या.
पोलीस अधिक्षक संधु म्हणाले की, अन्न्
व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील औषधी दूकानांची नियमित तपासणी करावी. प्रिक्रिप्शनशिवाय औषधांची विक्री होता कामा नये. तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी. शाळा महाविद्यालय
शेजारील टपऱ्यांवर विशेष लक्ष ठेवून अमंली पदाथाची विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी.
जिल्ह्यात खसखस किंवा गांजा पिकाची अवैध लागवड होणार नाही याची
सर्व कृषी विभागाने दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील
शहरी आणि तालुकास्तरावरील संवेदनशील ठिकाणे शोधून त्याठिकाणी नियमित तपासणी करावी.
तसेच खासगी ट्रॅव्हल्स आणि ट्रान्सपोर्ट करणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी करुन, दोषींवर
कठोर कारवाई करावी.
यावेळी अंमली
पदार्थांविरुध्द गुन्हे व करावयाची कार्यवाहीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.
****

No comments:
Post a Comment