जालना
,दि. 1 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने 05- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक
-2026 साठी कार्यक्रम दि.22 सप्टेंबर 2026 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या
दिनांकापासुन आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. सदर निवडणुक प्रचार फेरी /
मिरवणुकामध्ये जास्तीत जास्त 10 वाहने वापरता येतील. उमेदवार किंवा त्यांच्या
प्रतिनिधींनी दहापेक्षा अधिक वाहने वापर करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये निर्बंध घालण्यात आले आहेत.
असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आहेत.
निवडणुक प्रचार फेरी / मिरवणुकामध्ये जास्तीत जास्त 10 वाहने
वापरता येतील. त्यापेक्षा जास्त वाहने वापरण्यास संपूर्ण जालना जिल्ह्यांमध्ये
निवडणुक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घातले आहे. हे आदेश निवडणूक प्रक्रिया
पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. हे आदेश दि.
30 सप्टेंबर, 2026 ते दि. 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत संपूर्ण जिल्हा हद्दीत लागु
राहतील.
*****
No comments:
Post a Comment