जालना ,दि. 1 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने 05-
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2026 साठी
कार्यक्रम दि.22 सप्टेंबर 2026 रोजी घोषित केला आहे.
महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 33 अन्वये निवडणूकीचे साहित्य
कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा
पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.
असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आहेत.
निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार
संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपुर्ण
प्रक्रिया शांततेत, निर्भय न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय
पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधी किंवा
त्यांच्या हितचिंतकाने सार्वजनिक इमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर,
निवडणूकीसंबंधी पोस्टर्स, बॅर्नस, पॉम्प्लेट्स, कटआऊट्स, होर्डिंग्ज, कमानी लावणे
या व इतर बाबीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होवु शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता
नाकारता येत नसल्यामुळे त्यावर निर्बंध घालणे आवश्यक झाले आहे. असेही आदेशात नमुद
करण्यात आले आहे. हे आदेश दि. 30 सप्टेंबर, 2026 ते दि. 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत
संपूर्ण जिल्हा हद्दीत लागु राहतील.
******
No comments:
Post a Comment