Wednesday, 7 October 2026

वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आवाहन

 

सर्व शासकीय, निमशासकीय व शैक्षणिक संस्थांना आवाहन

 

जालना,दि.7 (जिमाका) : माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. शासन परिपत्रकानुसार वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या आहेत.

या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील राज्यातील कार्यालये, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, खाजगी उद्योग व आस्थापना, व्यापारी बँका तसेच सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे आणि महाविद्यालये यांनी वाचन प्रेरणा दिन साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मित्तल यांनी केले आहे.

वाचनाची सवय समाजात रुजविणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे. तसेच ज्ञान, विचार आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे, या उद्देशाने विविध वाचनविषयक उपक्रम आयोजित करण्यावर भर देण्यात आला आहे. संबंधित सर्व संस्थांनी आपल्या स्तरावर योग्य त्या उपक्रमांचे आयोजन करून, वाचन संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शासनाच्या सूचनेनुसार वाचन प्रेरणा दिनाचा उपक्रम व्यापक स्वरूपात राबवून नागरिक, विद्यार्थी आणि युवकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे. हे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) मनिषा दांडगे, यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

****

No comments:

Post a Comment