31 मार्च 2027 पर्यंत योजनेचा लाभ घेता येणार
जालना,दि.7 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनेंतर्गत वितरित करण्यात आलेल्या कर्जाची थकबाकी असलेल्या कर्जदारांसाठी एकरकमी कर्ज परतावा (OTS) योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या पात्र कर्जदारांना थकीत व्याजामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ हे राज्य शासनाच्या पूर्ण मालकीचे उपक्रम असून, महामंडळामार्फत इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगाराच्या विविध योजना राबविण्यात येतात. महामंडळाच्या थकीत कर्ज रकमेचा एकरकमी परतावा (OTS) योजना 31 मार्च 2027 पर्यंत राबविण्यात येणार आहे. महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी या सवलतीच्या योजनेचा लाभ घेऊन आपले कर्ज खाते निकाली काढावे व कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. एम. राठोड यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, जालना जिल्हा कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक 02482-223420येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
****
No comments:
Post a Comment