Monday, 5 October 2026

सेवा संकल्प अभियानातंर्गत चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 




 

जालना,दि.5(जिमाका) : शिक्षण विभाग जिल्हा परिषद जालना यांच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत   जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. सेवा संकल्प अभियानांतर्गत प्राथमिक शाळा वडगाववाडी, जि.प.के.प्रा. शाळा कीर्ला, जि.प.प्रा. शाळा केदारवाकडी, जि.प.प्रा.शाळा वांजोळा आणि जि.प.प्रा. शाळा भुतेगाव येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेवर आधारित विविध विषयावरील चित्रे रेखाटून भविष्यातील भारताचे स्वप्न आपल्या कलाकृतीतून साकारले.

      या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना देशाच्या विकासाची संकल्पना समजून घेण्याची तसेच ती चित्रांच्या माध्यमातून मांडण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी भारताच्या उज्ज्वल भविष्यातील विविध पैलू चित्रांमधून साकारले. पर्यावरण, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, स्वच्छता, आधुनिक भारत आणि प्रगतीशील राष्ट्र अशा विविध विषयांवर आधारीत विद्यार्थ्यांनी चित्र रेखाटल्याचे शिक्षण विभाग जिल्हा परिषद जालना यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-*-







No comments:

Post a Comment