Friday, 16 October 2026

केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी बदनापुर तालूक्यातील मौजे देवगाव येथे केली पीक परिस्थितीची पाहणी

 



जालना,दि.16(जिमाका) : यावर्षी अपेक्षेपेक्षा कमी पाऊस आणि प्रदीर्घ खंड पडल्यामुळे राज्यातील अनेक भागात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज बदनापुर तालूक्यातील मौजे देवगाव येथील शिवारातील शेत पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. शेतकरी बांधवांना या नैसर्गिक संकटातून बाहेर काढून त्यांना मदत करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यावेळी म्हणाले.

यावेळी बदनापूर उपविभागीय कृषी अधिकारी कुमारी बागुल, तहसीलदार श्री .नंदेश्वर, मंडळ कृषी अधिकारी श्री. कोरडे, कृषी अधिकारी श्री. गुरुजी यांच्यासह गावातील सरपंच व शेतकरी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*

No comments:

Post a Comment