जालना,दि.16 (जिमाका) : समाजकल्याण कार्यालयांतर्गत मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृहासाठी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह जालना, भोकरदन, अंबड, बदनापुर, घनसावंगी,
संत रामदास शासकीय वसतिगृह जालना, क्रांतीज्योती सावित्रीबाईफुले शासकीय वसतिगृह, जालना,
अंबड, मंठा, भोकरदन या शासकीय वसतिगृहामध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत
प्रवेश देण्यात येत आहेत.
त्यानुसार सन 2026-27 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी
स्पॉट ॲडमिशनसाठी सहायकआयुक्त, समाजकल्याण कार्यालयात अर्ज केले आहेत. अशा विद्यार्थ्यांनी दि. 17 ऑक्टोबर 2026 ते 21 ऑक्टोबर 2026 या कालावधीमध्ये
https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करावेत. या तारखेनंतर आलेले अर्ज
स्वीकारले जाणार नाही.
शासकीय वसतिगृहात विनामुल्य निवास व भोजनासह
शैक्षणिक साहित्य, निर्वाहभत्ता, ग्रंथालय, जिम व इंटरनेट वाय-फाय इत्यादी सुविधा विनामुल्य
उपलब्ध करून देण्यात येतात. तरी गरजु विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे ऑनलाईन अर्ज करण्याचे
आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
केले आहे.
****
No comments:
Post a Comment