जालना,दि.15 (जिमाका) : सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जालना यांच्या
वतीने राबविण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध आरोग्यविषयक
उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध
करून देण्यावर भर देण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दि. 15 आज रोजी अंबड तालुक्यातील
प्राथमिक आरोग्य केंद्र धनगर पिंपरी येथे 5 किशोरवयीन 14 वर्ष पूर्ण व 15 वर्षे पूर्ण
न झालेल्या मुलींना एच पी व्ही लस देण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र सातोना अंतर्गत
उपकेंद्र उस्मानपुर येथे ऊस तोडीसाठी आलेल्या कामगारांच्या टोळी वस्तीवर जाऊन आरोग्य
तपासणी करून पोषण आहार, स्वच्छता बाबत माहिती देण्यात आली. जाफराबाद तालुक्यातील प्राथमिक आरोग्य वरुड बुद्रुक येथे 11 किशोरवयीन 14 वर्ष पूर्ण व 15 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना
एच पी व्ही लस देण्यात आली. ज्यामुळे गर्भाशयाच्या मुख कर्करोगापासून संरक्षण मिळते
तसेच बदनापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र दाभाडी अंतर्गत गोकुळवाडी येथे नियमित
लसीकरण करण्यात आले. एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती व लसीकरणाचे आयोजन करण्यात आले
होते.
यावेळी
किशोरवयीन मुलींच्या आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन एचपीव्ही लसीकरणाची माहिती देण्यात
आली. या उपक्रमामुळे मुलींमध्ये लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होत आहे. लसीकरणाबाबत मार्गदर्शन करून लस देण्यात आली.
या उपक्रमातून
किशोरवयीन मुलींच्या आरोग्य संरक्षणाला प्राधान्य देण्यात येत असून, ग्रामीण भागातील
नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक माहिती व सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न आरोग्य विभागामार्फत
करण्यात येत आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment