जालना,दि.13(जिमाका) : सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद
जालना यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ जिल्ह्यात विविध
आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य
सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दि. 13 आज रोजी जालना
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र डुकरी पिंपरी आणि पिरपिंपळगाव, तसेच अंबड तालुक्यातील
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मठ पिंपळगाव, तसेच जाफ्राबाद तालुक्यातील प्राथमिक आरोग्य
केंद्र डोंणगाव येथे एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती व लसीकरणाचे आयोजन करण्यात आले
होते.
यावेळीकिशोरवयीन मुलींच्या आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन एचपीव्ही लसीकरणाची माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे मुलींमध्ये लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होत आहे. या अभियानांतर्गत धनगरपिंपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्र मठ पिंपळगाव येथे ३ मुली, विरेगाव येथील उपकेंद्र डुकरी पिंपरी येथे ४ मुली, प्राथमिक आरोग्य केंद्र, डोंणगाव येथे 6 मुली, प्राथमिक आरोग्य केंद्र पिरपिंपळगाव येथे ५ मुली, तसेच जिरडगाव येथील उपकेंद्रातील ढाकेफळ येथे ३ मुलींना एचपीव्ही लसीकरणाबाबत मार्गदर्शन करून लस देण्यात आली.
या उपक्रमातून किशोरवयीन मुलींच्या आरोग्य संरक्षणाला प्राधान्य देण्यात येत असून, ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक माहिती व सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
****


No comments:
Post a Comment