जालना,दि.12(जिमाका) : परतूर तालुक्यातील मौजे सातारा (वाहेगाव) येथील अनेक
दिवसांपासून प्रलंबित असलेला रस्ता व स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशानुसार गठित करण्यात
आलेल्या कमिटीच्या यशस्वी मध्यस्थीमुळे व केलेल्या कारवाईमुळे मोकळा झाला. यामुळे
स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मौजे
सातारा (वाहेगाव) येथील शेत गट क्र. ११७ व ११८ ला ११४ मधून मुख्य रस्त्यापासूनचा
सामाईक विहीर व श्मशानभूमी सर्व्हे नं. आणि गट नं. बांध, तसेच गट क्र. ११९/१४७
च्या बांधाने जाणारा रस्ता मागील काही दिवसांपासून बंद करण्यात आला होता. स्मशानभूमी
आणि सामाईक विहिरीकडे जाणारा हा मुख्य मार्ग बंद असल्याने स्थानिक नागरिकांची व
शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली होती.
या
प्रकरणाची जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने दखल घेत एक विशेष समिती नेमण्याचे आदेश
दिले. या समितीने घटनास्थळी भेट देऊन सर्व संबंधित घटकांशी संवाद साधत सकारात्मक
मध्यस्थी केली. समितीच्या यशस्वी मध्यस्थीमुळे व प्रशासकीय कारवाईमुळे बंद असलेला
हा रस्ता पुन्हा सुरळीत व पूर्णपणे खुला करण्यात आला.
****

No comments:
Post a Comment