जालना,दि.13
(जिमाका) : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनविषयक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी
बुधवार, दि. 14 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्हा परिषद जालना येथे पेन्शन अदालत आयोजित करण्यात
आली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) जिल्हा परिषद जालना यांच्या दालनात ही पेन्शन
अदालत होणार आहे.
विभागीय
आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील उपआयुक्त (आस्थापना) यांच्या दि. 24 जुलै
2019 रोजीच्या पत्रातील निर्देशानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा
करण्यासाठी ही पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.
पेन्शन
अदालतीचे विभागनिहाय वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, सकाळी 11 ते 11.30 या वेळेत
शिक्षण (प्राथमिक), कृषी, आरोग्य, महिला व बालकल्याण विभागांशी संबंधित प्रकरणे हाताळण्यात
येतील. सकाळी 11.30 ते दुपारी 12 या वेळेत सामान्य प्रशासन, वित्त, पंचायत व सिंचन
विभागांच्या तक्रारींची सुनावणी होईल. तर दुपारी 12 ते 12.30 या वेळेत ग्रामीण पाणीपुरवठा,
बांधकाम, पशुसंवर्धन व समाजकल्याण विभागांशी संबंधित प्रकरणे विचारात घेतली जातील.
पेन्शनविषयक प्रकरणे प्रलंबित असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी निर्धारित मुदतीत
आपले अर्ज सादर करून या पेन्शन अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
****
No comments:
Post a Comment