Friday, 16 October 2026

जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी अर्ज करण्यास 22 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

 


 

जालना,दि.16 (जिमाका) : जवाहर नवोदय विद्यालय लॅटरल एन्ट्री (वर्ग -9 वी 11 वी ) प्रवेश परीक्षा -2027 दि. 10 एप्रिल 2026 साठीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरले जातात. जिल्ह्यातील इयत्ता 8 वी व इयत्ता 10 वी वर्गात सन 2026-27 मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांसह सेवा केंद्रावर तसेच इतर यंत्रणेचा वापर करुन ऑनलाईन अर्ज भरावा. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2026 देण्यात आली होती. अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली असून दि. 22 ऑक्टोबर 2026 पर्यंत करण्यात आली आहे.

तरी इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालक, शिक्षक व मुख्याध्यापकांनी याची नोंद घेऊन ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी फोटो, स्वाक्षऱ्या 10ते 100 केबीमध्ये स्कॅन कराव्यात. वर्ग नववीसाठी  या https://cbseitms.nic.in/2026/ncsix9 संकेतस्थळावरुन व अकारावीसाठी या https://cbseitms.nic.in/2026/ncsxi11 संकेतस्थळावर अर्ज करावेत.

जिल्हातील सर्व मुख्याध्यापकांनी  जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.जी. पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

****

No comments:

Post a Comment