Monday, 26 October 2026

महर्षी वाल्मिकी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



जालना,दि.26 (जिमाका) : महर्षी वाल्मिकी यांच्या  जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ  यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी नायब तहसिलदार विक्रांत मोंढे, महसूल अधिकारी दिपाली राऊत-वानखडे, रिना नगरकर, संपदा कुलकर्णी, अरुण डुकरे, वसुधा फटके, ज्योती वाघ, रुपा येंगुपटला, वृषाली नवले,सुनिल काळुंके व इतर तसेच प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment