जालना, दि.23 (जिमाका) : जालना जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त
27 ऑक्टोबर रोजी बालकांना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. या दिवशी गोळ्या घेता
न आलेल्या बालकांसाठी 3 नोव्हेंबर 2026 रोजी मॉप-अप दिन आयोजित करण्यात आला आहे.
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 0 ते 19 वर्षे
वयोगटातील 4 लाख 32 हजार 738 ग्रामीण भागातील बालकांना, तर शहरी भागातील 2 लाख 37 हजार
39 व मनपा जालना येथील 74 हजार 653 य बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन आहे.
अशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्यात एकूण 7 लाख 44 हजार 426 बालकांना गोळ्या देण्याचे उद्दिष्ट
निश्चित करण्यात आले आहे.
जंतनाशक गोळ्यांमुळे मुलांचे आरोग्य सुधारण्यास
मदत होते. शरीरातील जंतांमुळे रक्तक्षय, कुपोषण आणि शारीरिक व मानसिक विकासावर विपरीत
परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना वयानुसार जंतनाशक गोळ्या देऊन त्यांच्या
आरोग्याची काळजी घ्यावी.
या मोहिमेचे नियोजन सूक्ष्म पद्धतीने करण्यात
आले असून, ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि अंगणवाडी ताई यांना
प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यातील 4 हजार 84 मनुष्यबळाच्या माध्यमातून ही मोहीम
राबविण्यात येणार आहे.
पालकांनी 1 ते 19 वर्षे वयोगटातील आपल्या मुलांना
जंतनाशक गोळ्या देण्याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन , असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. जयश्री भुसारे यांनी केले आहे.
-*-*-*-*-*-*-
.jpeg)

No comments:
Post a Comment