जालना, दि.23 (जिमाका) : 05-औरंगाबाद
विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यात शुक्रवार, (दि.23)
रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ
निवडणुकीसाठी जालना जिल्ह्यातील 89 मतदान केंद्रावर एकूण 61.14 टक्के मतदान झाल्याची माहिती
जिल्हाधिकारी तथा सहायक जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.
05-औरंगाबाद
विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जालना जिल्ह्यातील 89 मतदान केंद्रात मतदान
प्रक्रिया शांततेत पार पडली. यामध्ये जालना तालुक्यात 53.82 टक्के तर बदनापुर
तालुक्यात 57.25 टक्के, अंबड तालुक्यात 65.65 टक्के घनसावंगी तालुक्यात 66.23
टक्के, परतुर तालुक्यात 70.76 टक्के,मंठा तालुक्यात 56.50 टक्के, भोकरदन तालुक्यात
63.69 टक्के आणि जाफ्राबाद तालुक्यात 58.22 टक्के तर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क
बजावला असुन, जालना जिल्ह्यात 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी एकुण 61.14
टक्के मतदान झाले आहे.
No comments:
Post a Comment