जालना, दि. 28 (जिमाका) : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे शुक्रवार, दि. 31 जुलै, 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी
कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात
आले आहे. या बैठकीला समितीवर नियुक्त शासकीय सदस्य, अशासकीय सदस्यांनी वेळेवर उपस्थित
रहावे. तसेच सर्वसामान्य नागरिकांचे ग्राहक हितासंबंधीत
तक्रार असल्यास सदर बैठकीच्या दिवशी उपस्थित राहून आपला लेखी स्वरुपाचा अर्ज सादर करावा.
नागरिकांना ग्राहक या संबंधाने काही अडचणी असल्यास त्याबाबत
जालना जिल्ह्याचे संकेतस्थळ jalna.nic.in यावर ग्राहकांच्या तक्रारीसाठी पोर्टल उपलब्ध करुन दिलेले असून, नागरिकांनी त्यांच्या
समस्या या पोर्टलच्या माध्यमातून सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी तथा
जालना संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव शशीकांत हदगल यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment