जालना, दि. 31(जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना कार्यालयामार्फत "तृतीयपंथीयांच्या
हक्कांचे संरक्षण व कल्याण योजना" अंतर्गत जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींसाठी मार्गदर्शन
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
तृतीयपंथीयांची
कार्यशाळा दि. 3 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11.00
वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे आयोजित करण्यात आली आहे.
कार्यशाळेमध्ये तृतीयपंथीय व्यक्तींचे हक्क, शासनामार्फत
राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास,
स्वयंरोजगार, सामाजिक सुरक्षा, ओळखपत्रे, कायदेशीर संरक्षण तसेच शासकीय योजनांचा
लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तसेच उपस्थित तृतीयपंथीयांच्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्यावर आवश्यक
मार्गदर्शन व उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीय
व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांची
माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment