जालना,
दि.22 (जिमाका) : नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या,
कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी आणि मार्गदर्शन उपलब्ध
करण्याच्या उद्देशाने रोजगार स्वयंरोजगारसहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली
आहे. यानुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर
सेंटर जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांचे मार्फत शुक्रवार, दि. २४ जुलै, २०२६ रोजी
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जिल्हाधिकारी
कार्यालय दुसरा मजला,जालना येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन सकाळी 11 ते 2 दरम्यान
करण्यात आले आहे.
याकरिता गरवारे हायटेक प्रा. लि. छत्रपती
संभाजी नगर यांचे दहावी, बारावी, पदवीधर उत्तीर्ण युवक-युवती करिता अप्रेंटिसचे 10
पदे, तसेच अजित सीड्स प्रा. लि. छत्रपती संभाजी नगरचे दहावी, बारावी, पदवीधर उत्तीर्ण
युवक-युवती उत्तीर्ण करिता अप्रेंटिसचे 10 पदे, त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद नागरी
सह पतसंस्था मर्या,जालना यांची कोणतीही पदवी उत्तीर्ण तसेच एम.बी.ए. मार्केटिंग पदवीधर
यांची मार्केटिंग एक्झिक्युटिव्हसाठी 15 पदे अशी एकूण 35 रिक्त पदे प्राप्त झाली आहेत.
यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने मध्ये देखील प्रशिक्षणासाठी काही पदे
भरण्यात येणार आहेत. याकरीता नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणाऱ्या उमेदवारांच्या
प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध होणार आहे .जालना जिल्ह्यातील
नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहितीसाठी विभागाच्या
www.cmykpy.mahaswayam.gov.in त्याच प्रमाणे केंद्र शासनाच्या www.ncs.gov.in या वेबसाईटला
भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होमपेज वरील
नोकरी साधक (Job Seekar) लॉगिन मधून आपल्या युजर आयडी व पासवर्डच्याआधारे लॉगिन करावे.
त्यानंतर जागेवर निवड संधी (2025-26) प्लेसमेंट ड्राईव्ह 3 या बटनावर क्लिक करून जालना
जिल्हाची निवड करावी. उद्योजक / नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी अर्ज करावा.
मुलाखतीसाठी बायोडाटा किमान दोन प्रती सोबत ठेवून शुक्रवार, दि. 24 जुलै, 2026 रोजी
जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जिल्हाधिकारी
कार्यालय दुसरा मजला, जालना येथे उपस्थित रहावे असे आवाहन सहायक आयुक्त, ककौशल्य विकास
रोजगार व उद्योजकता, गणेश चिमणकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
केले आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment