Wednesday, 1 July 2026

शैक्षणिक वर्ष 2026-27 महाडीबीटी 2.0 प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती/फ्रीशिप अर्ज प्रक्रिया सुरू

 


 

जालना, दि. 1 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता महाडीबीटी २.० ही नव्याने विकसित करण्यात आलेली ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, या प्रणालीद्वारे नवीन (Fresh) व नूतनीकरण (Renewal) शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क/परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशिप) योजनांचे अर्ज नोंदणी, तपासणी व मंजुरीची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. या नवीन प्रणालीमध्ये विद्यार्थी, महाविद्यालये व समाज कार्यवाही यावर भर देण्यात आला आहे. कल्याण विभाग यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या असून अर्ज प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, अचूकता व जलद कार्यवाही यावर भर देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनी करावयाची कार्यवाही

महाडीबीटी 2.0 प्रणालीमध्ये नवीन महाआयडी (MahalD) तयार करणे बंधनकारक आहे.आधार क्रमांकाशी संलग्न महाआयडी तयार करून आधार पोर्टलवरील माहिती (पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल, बँक खाते इ.) अद्ययावत ठेवावी.जातीचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, गुणपत्रिका आदी आवश्यक कागदपत्रे PDF स्वरूपात तयार ठेवावीत.नवीन (Fresh) व नूतनीकरण (Renewal) अर्जासाठी महाआयडी/आधारद्वारे लॉगिन करावे.नूतनीकरणासाठी "माझा अर्ज नूतनीकरण करावा" हा पर्याय निवडावा.

महाविद्यालयांनी करावयाची कार्यवाही.

महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या लॉगिनद्वारेच अर्ज तपासणी व मंजुरी करावी.महाविद्यालयाचे प्रोफाईल, शुल्क रचना व इतर माहिती अद्ययावत ठेवावी. पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज वेळेत तपासून मंजूर करावेत. कोणताही पात्र अर्ज प्रलंबित ठेवू नये.

समाज कल्याण विभागाने करावयाची कार्यवाही

सहाय्यक आयुक्त स्तरावर पात्र अर्जाची अंतिम मंजुरी देण्यात येईल. विद्यार्थी, पालक व महाविद्यालयांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल. वृत्तपत्रे, समाजमाध्यमे, कार्यशाळा व जनजागृतीद्वारे योजनांची व्यापक प्रसिद्धी करण्यात येईल. Zero Pendency (शून्य प्रलंबित) हे उद्दिष्ट ठेवून सर्व अर्जावर वेळेत कार्यवाही करण्यात येईल.

 

सर्व पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे अचूक व सत्य स्वरूपात अपलोड करावीत. महाविद्यालयांनी अर्ज तपासणीची कार्यवाही वेळेत पूर्ण करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व फ्रीशिप योजनांचा लाभमिळण्यासाठी सहकार्य करावे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना कार्यालयाशी संपर्क साधण्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. अनिता राठोड,  यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

No comments:

Post a Comment