जालना दि.30 (जिमाका) : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य
विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान
निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी
अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या
मार्फत राबविण्यात येतात.
सन 2026-27 साठी विविध समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील
शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध आहे. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध (download) करुन
घ्यावा.
सन
2026-27 साठीच्या समान निधी योजना पुढीलप्रमाणे आहेत. (Matching Schemes)इमारत बांधकाम
व विस्तार अर्थसहाय्य योजना कमाल रु. 25 लाख.
वरील योजनेव्यतिरिक्त
समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पध्दतीने देण्यात येत असल्यामुळे
इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करु नयेत.
सन 2026-27 साठीच्या असमान निधी योजना पुढीलप्रमाणे आहेत. (Non
Matching Schemes)
ग्रंथालय
सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार
यासाठी अर्थसहाय्य (फर्निचर खरेदी रु. 4 लाख व इमारत बांधकाम (प्रस्ताव फक्त एकदाच)
रु. 10 ते 15 लाख)
"ज्ञान
कोपरा" विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य (रु. २.५० लाख) व विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरण
(रु. 2 लाख)
महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य
- (रु.6.20 लाख / व इमारत विस्तार रु. 10 लाख). राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा,
प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य (रु. 1.50 लाख/रु. 2.50
लाख रु. 3 लाख)
"बालकोपरा"
स्थापन करण्याकरीता अर्थसहाय्य कमाल (रु. 6.80 लाख)
योजनेसाठी करावयाचा
अर्ज :-वरील योजनांचा
लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी प्रतिष्ठानचे www.mmlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. आवश्यकता
असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी
वरील पैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह
इंग्रजी/ हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि. 21
ऑगस्ट 2026 पर्यंत पाठवावेत, तसेच राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या
ऑनलाईन प्रणालीव्दारेही ऑनलाईन पाठविण्यात यावेत, असे आवाहन . प्र. ग्रंथालय संचालक,
ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन अशोक गाडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
केले आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment