जालना,दि.31(जिमाका) : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत
सरकार अंतर्गत मेरा युवा भारत, जालना व डॉ.
वेदप्रकाश पाटील आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने
‘जिल्हास्तरीय नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ स्पर्धेचे आयोजन डि.जे.पी. कॅम्पस, रेवगाव
रोड, जालना
येथे उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा युवा अधिकारी मयुरकुमार गोरमे यांच्या मार्गदर्शनाखाली
करण्यात आले.
स्पर्धेत चित्रकला, घोषवाक्य
लेखन, भाषण, लोकनृत्य, लोकगीत, रिल
निर्मिती, पथनाट्य
आणि मौखिक कविता अशा आठ विविध स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी नशामुक्त
भारताचा संदेश प्रभावीपणे सादर करत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.कार्यक्रमाची
सुरुवात धन्वंतरी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व
धन्वंतरी प्रार्थनेने झाली.
कार्यक्रमाचे उद्घाटन सहायक जिल्हाधिकारी डॉ.
रंगमंजु यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून सहायक आयुक्त (कौशल्य विभाग)
गणेश चिमणकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड उपस्थित होते. अध्यक्षस्थानी
डॉ. वेदप्रकाश पाटील आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मिनल ठोसर
होत्या.
भागवत शिंदे प्रशासकीय अधिकारी डी.जे.पी, डॉ. विठ्ठल कुचके
प्राचार्य ओजस कॉलेज फार्मसी, डॉ.कृष्ण कुमार सिंग प्राचार्य ओजस कॉलेज
फिजीयोथेरीपी, डॉ.के.जे.रमीता प्राचार्य ओजस कॉलेज ऑफ नर्सींग, डॉ.संगीता गायकवाड
बी.एड. कॉलेज डी.जे.पी, विनीत म्हणुन मयुरकुमार गोरमे जिल्हा युवा अधिकारी माय
भारत, डॉ.मुकुंद बंडले उप.प्रा डॉ.वे.पा.आ.वै.महा. व पुरुषोत्तम राखुंडे प्रा. ओजस
कॉलेज फार्मसी उपस्थिती होते.
प्रास्ताविकात डॉ. मिनल ठोसर यांनी नशामुक्त
भारत अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले. सहायक जिल्हाधिकारी डॉ. रंगमंजु यांनी
विद्यार्थ्यांना व्यसनाचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगत
व्यसनमुक्त जीवनाचा संदेश दिला. तसेच गणेश चिमणकर यांनी सर्व उपस्थितांना
नशामुक्तीची शपथ दिली.
स्पर्धांचे परीक्षण डॉ.बी.जी.श्रीरामे,
डॉ.शिवानंद मुंढे, डॉ.मोनिश शिंदे, श्रीमती कांचन वाघ, व्ही.आर.ठोंबरे, डॉ.अभिषेक
शुक्ला, डॉ. रेणुका भावसार बडवणे, डॉ.सुजाता देवरे, श्री शशिकांत वडले, मिलींद
सावंत, डॉ. दिपक बुक्तरे, डॉ. अस्मिता शिंदे, डॉ.निशिकांत लोखंडे, विनोद जैतमहल,
डॉ. अभिजीत जोशी, सतिष लिंगडे, लक्ष्मीकांत पोलास, डॉ. निधी शर्मा, परमेश्वर
क्षिरसागर, गणेश नागवे, डॉ. गंगाधर धांडगे, बिस्मील्ला सय्यद, प्रशंसा घोरपडे यांनी केले.
स्पर्धेतील विजेत्यांमध्ये मौखिक कविता
स्पर्धेत नम्रता पवार, प्रांजल
तस व ऋतुजा गरजे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. लोकनृत्य
स्पर्धेत वैष्णवी ढाकीणकर व टीम प्रथम, तनुजा पवार व टीम द्वितीय तर सारिका नागरे व
टीम तृतीय ठरली. भाषण स्पर्धेत साक्षी सुरेश डांगे, श्वेता नवनाथ देशमुख व भूमिका आढाव यांनी
अनुक्रमे प्रथम, द्वितीय
व तृतीय क्रमांक पटकावला.
घोषवाक्य स्पर्धेत साक्षी राजेंद्र ठाकूर, स्नेहा
श्याम खरात व नेहा संजय जोगदंड, रिल स्पर्धेत शिवराज टेकाळे, जयदीप
शिंदे व प्रगती बोरुडे, लोकगीत
स्पर्धेत पियुष पाटील व टीम, साईनाथ पवार व अर्जुन उबाळे, चित्रकला
स्पर्धेत अनुश्री कदम, स्वराली
लाडे व कल्याणी पाटील, तर
पथनाट्य स्पर्धेत पल्लवी व टीम, श्रावणी व टीम आणि कैफ खान यांनी अनुक्रमे
प्रथम, द्वितीय
व तृतीय क्रमांक मिळविला.
स्पर्धेतील विजेत्यांना अप्पर पोलीस अधीक्षक
विक्रांत साळी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे संजय सोनवणे यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व
ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.
कार्यक्रमाचा समारोप जिल्हा युवा अधिकारी
मयुरकुमार गोरमे यांनी केला. सूत्रसंचालन धरतीधन ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष
मिलिंद सावंत आणि सहारा सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष बी. एस. सय्यद यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवा
बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जयपाल राठोड तसेच महाविद्यालयाचे अजित लाटे, अंकित
कड, फैजान
शेख, अफान
हाश्मी, महेश
देशमुख, प्रणव
खेडकर व महाविद्यालयातील कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
-*-*-*-*-*-
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment