Monday, 20 July 2026

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

 

जालना, दि.20 (जिमाका) : महात्मा फुले मागासवर्ग  विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालयात सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरीता अनुदान योजने अंतर्गत -15 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट असून बीज भांडवल योजनेअंतर्गत -15 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट आहे.

अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील इच्छुक अर्जदाराने सदरील योजनेचा लाभ घेण्याकरीता माहे ऑगस्ट-2026 अखरेपर्यंत पध्दतीने http://mahadisha.mpbcdc.in या वेबसाईटवर अर्ज सादर करावा. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने पुढीलप्रमाणे कागदपत्रे अपलोड करावेत. जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, पॅन कार्ड, कोटेशन, प्रकल्प अहवाल, व्यवसाय जागेचा पुरावा, 2 पासपोर्ट साईज फोटो, व्यवसायाचे लायसन्स इत्यादी. कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन महात्मा फुले मागसवर्ग विकास महामंडळ मर्या. जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*- 

No comments:

Post a Comment