जालना, दि.2 (जिमाका) : पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना सन 2026-27 या वर्षाकरीता जालना
जिल्ह्यात अधिसुचित फळपिकांकरिता ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी मार्फत राबविण्यात
येत आहे.
या योजनेत मृग बहार सन 2026-27 मधील
मोसंबी, द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, संत्रा, लिंबू, पेरू, चिकू आणि हळद या पिकांचा
समावेश आहे. या योजनेंतर्गत कमी पाऊस, पावसाचा खंड, जास्त तापमान, सापेक्ष आद्रता
या हवामान घोक्यापासून संरक्षण मिळणार आहे. मोसंबी, द्राक्ष, डाळिंब, संत्रा,
लिंबू, पेरू, चिकू आणि हळद पिकाकरीता भाग घेण्याची अंतिम मुदत 14 जुन, 2026 अशी
होती. परंतु मृग बहार सन 2026-27 मध्ये मोसंबी, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, लिंबू,
पेरू, चिकू आणि हळद या पिकाकरीता पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत
सहभागी होण्याकरीता दि. 14 जुलै, 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तसेच पुढीप्रमाणे फळपिकारीता अर्ज करण्याची
अंतिम मुदत 14 जुलै, 2026 आहे. मोसंबी उत्पादन वय 3 वर्ष, विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर नियमित 1 लाख
रुपये, द्राक्ष उत्पादन वय 2 वर्ष, विमा
संरक्षित रक्कम प्रति हेक्टर नियमित 3 लाख 80 हजार रुपये, डाळिंब उत्पादन
वय 2 वर्ष, विमा संरक्षित रक्कम प्रति
हेक्टर नियमित 1 लाख 60 हजार रुपये, संत्रा उत्पादन वय 3 वर्ष, विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर नियमित 1 लाख
रुपये, लिंबू उत्पादन वय 4 वर्ष, विमा
संरक्षित रक्कम प्रति हेक्टर नियमित 80 हजार रुपये, पेरु उत्पादन वय 3 वर्ष विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर नियमित 70
हजार रुपये, चिकू उत्पादन वय 5 वर्ष, विमा
संरक्षित रक्कम प्रति हेक्टर नियमित 70 हजार
रुपये, हळद विमा संरक्षित रक्कम
प्रति हेक्टर नियमित 1 लाख 80 हजार रुपये
अशी आहे.
तर सीताफळ या फळासाठी दि. 31 जुलै 2026
अंतिम मुदत असून उत्पादन वय 3 वर्ष, विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर नियमित 70
हजार रुपये अशी आहे.
पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा
योजना विमा योजनेत भाग घेण्यासाठी फळपिक विमा ऑनलाईन पोर्टल www.pmfby.gov.in वर सहभाग नोंदवावा. तरी
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले
आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment