जालना, दि. 29 (जिमाका) : जिल्ह्यातील इतर
मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (EBC) आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती (DNT) या प्रवर्गातीलकेंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
मंत्रालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या "PM YASASVI" (Top Class
Education in School) या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सन २०२६-२७
या शैक्षणिक वर्षासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर (NSP) ऑनलाइन
अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
शासन शुध्दीपत्रकान्वये इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या
मागास प्रवर्गातील (EBC) आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती (DNT) या प्रवर्गातील विद्यार्थी या
योजनेसाठी पात्र आहेत सन 2026-27 "PM YASASVI" (Top Class Education
in School) शिष्यवृत्ती योजनाही
संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक संचालक इतर मागस बहुजन कल्याण यांच्यामार्फत
राबविण्यात आलेली आहे. मान्यताप्राप्त 'टॉप क्लास' शाळांमध्ये चालू वर्षातइयत्ता ९ वी आणि
११ वीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी
स्वतःचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आहे. मागील वर्षात
(२०२५-२६) या योजनेचा लाभ घेतलेल्या इयत्ता ९ वी आणि ११ वी च्या विद्यार्थ्यांनी
देखील चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्या अर्जांचेनूतनीकरण (Renewal) करणे
आवश्यक आहे. या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत आपले अर्ज आवश्यक
कागदपत्रांसह नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर (NSP) ऑनलाइन
नोंदवावेत. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेतील मुख्याध्यापक किंवा
नोडल शिक्षकांशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन अंनतकदम, सहाय्यक संचालक
इतर मागास बहुजन कल्याण, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment