जालना, दि.7 (जिमाका): जागतिक युवा कौशल्य दिन 15
जुलै निमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा
मॉडेल करिअर सेंटर, जालना यांच्या वतीने दि. 7 ते 15 जुलै 2026
या कालावधीत सामायिक भविष्यासाठी
कौशल्य या संकल्पनेवर आधारित कौशल्य सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
या सप्ताहामध्ये युवक-युवती,
विद्यार्थी, महिला तसेच उद्योजकांसाठी विविध स्पर्धा, कार्यशाळा, सन्मान सोहळे,
वृक्षारोपण, सामंजस्य करार आणि रोजगार मेळावा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात
आले आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक : कौशल्य सप्ताहाची सुरुवात
दि.7 जुलै 2026 रोजी सकाळी 8 ते
10 या वेळेत आयोजित रांगोळी स्पर्धेने
होणार आहे. दि.8 जुलै 2026 रोजी सकाळी 11.00
वाजता मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी नियुक्तीपत्र वाटप
करण्यात येईल, तर दुपारी 12.00 वाजता
उत्कृष्ट उद्योजक, कौशल्य प्रशिक्षण संस्था तसेच मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण
योजना नियोक्ता यांचा सन्मान करण्यात येणार आहे. दि.
9 जुलै2026 रोजी सकाळी 10.00
वाजता पोलीस परेड ग्राउंड, बॅडमिंटन हॉल, जालना येथे सुरक्षा मंत्र- आधुनिक जगात एक पाऊल पुढे
या विषयावर इयत्ता पाचवी व त्यापुढील विद्यार्थीनी तसेच महिलांसाठी महिला स्वसंरक्षण कार्यशाळा
आयोजित करण्यात आली आहे.
दि. 10 जुलै 2026 रोजी सकाळी 11.00
वाजता पारशी टेकडी, जालना येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून,
त्यानंतर दुपारी 12.00 बदनापूर येथील VSS
कॉलेज ऑफ फार्मसी येथे कौशल्य
विकास काळाची गरज या विषयावर वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. दि.
13 जुलै रोजी सकाळी 11.00 वाजता
कौशल्य विकास विभागाच्या योजना व उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी नामांकित
महाविद्यालयांसोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. दि.
14 जुलै 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता अण्णासाहेब
पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थी यशस्वी उद्योजक व उद्योजिकांचा
सन्मान करण्यात येईल. कौशल्य सप्ताहाचा समारोप दि.
15 जुलै 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता पोलीस
परेड ग्राउंड, बॅडमिंटन हॉल, जालना येथे आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याने होणार
आहे.
या कौशल्य सप्ताहातील विविध
स्पर्धा व उपक्रमांमध्ये सर्व इच्छुक युवक-युवती, विद्यार्थी, महिला आणि
नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक
माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय
इमारत, दुसरा मजला, जालना येथे संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक 02482-299033 तसेच
ई-मेल jalnarojgar@gmail.com
वरही माहिती उपलब्ध आहे.
असे आवाहन सहायक
आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गणेश चिमणकर, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment