जालना, दि. 16 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने "ग्रामोद्योग
भरारी पुरस्कार 2026 साठी नामांकने मागविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. शासकीय
योजनांच्या माध्यमातून विशेष करून ग्रामीण भागात यशस्वी उद्योग उभे करणाऱ्या
उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने ही पुरस्कार
योजना सुरु केली आहे. यंदा या पुरस्काराचे चौथे वर्ष आहे पुरस्कार योजनेत प्रथम,
व्दितीय व तृतीय असे तीन पुरस्कार देण्यात येतात व काही उद्योजकांना उत्तेजनार्थ
पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. संकल्पनेतुन उद्योगाच्या वृध्दीसाठी व
उदयोगाला चालना व गती देण्यासाठी सन 2023 पासून राज्यस्तरीय "ग्रामोद्योग
भरारी पुरस्कार" सुरु करून माध्यमातून प्रथम, व्दितीय व तृतीय, उत्तेजनार्थ
पुरस्कार देण्यात येत आहेत.
मंडळामार्फत शासनाच्या विविध योजनांच्या
माध्यमातून अर्थसहा-य घेवून यशस्थिपणे उद्योग उभारणी करून रोजगाराच्या नविन संधी
उपलब्ध केलेल्या मंडळाच्या यशस्वी उद्योजकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे व
त्यांचा यथोचित सन्मान व्हावा याकरिता महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग
मंडळामार्फत राज्यस्तरीय ग्रामोद्योग भरारी पुरस्कार 2026 करिता अर्ज मागवण्यात
येत आहेत.नामांकन अर्ज मंडळाच्या www.mskvib.org या संकेतस्थळावर तसेच खादी व
ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी आपले नामांकन
अर्ज दि.28 जुलै, 2026 पूर्वी जिल्हा कार्यालयात पाठवावेत अधिक माहितीसाठी
संपर्क:- जिल्हा ग्रामोदयोग अधिकारी, जिल्हा कार्यालय अशी माहिती
जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment