Tuesday, 14 July 2026

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


            जालना, दि.14 (जिमाका): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असून या योजनेसाठी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून 60 टक्के गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थी/ विद्यार्थिनींकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यासाठी जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची गुणानुक्रमानुसार निवड मुख्यालय मुंबई यांच्याकडून उपलब्ध निधीच्या प्रमाणात केली जाते.

सदर योजनेचा अर्जकरीत असताना अर्जासोबत खालील प्रमाणे दिलेले कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.

अर्जदाराचा जातीचा दाखला सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा, अर्जदाराच्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार यांच्याकडून घेतलेला असावा. आधार कार्ड, राशन कार्ड झेरॉक्स प्रत, गुणपत्रक, दोन पासपोर्ट फोटो, बोनाफाईड/पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती.

अर्जदाराने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब सामाजिक न्याय भवन, तळमजला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येथे दि. 25 जुलै,2026 पर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर.एन. पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment