Thursday, 9 July 2026

स्वाधार योजनेच्या लाभासाठी शासकीय वसतिगृहाचा अर्ज भरणे अनिवार्य

 


 

जालना,दि.9 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. इयत्ता 11 वी व 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाहभत्ता व इतर आवश्यक सुविधावर खर्च करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू केली आहे.

 

सदर योजनेतंर्गत जालना महानगरपालिकेच्या हदीपासून 5 किलोमिटरच्या आत असलेल्या महाविद्यालयांमध्ये इयत्ता 11 वी 12 वी तसेच 12 वी नंतर व्यावसायिक व विगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार देय असलेली रक्कम मंजुर केली जाते. सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रूपये 2.50 लाखाच्या आत असणे अपेक्षीत आहे. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यास 10 वी, 11 वी व 12 वी या अभ्यासक्रमास किमान 50% गुण असणे अपेक्षीत आहे. तसेच अनु. जाती व नवबौध्द घटकातील दिव्यांगासाठी 40% गुण असणे अपेक्षीत आहे. सदर विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान 75% असणे अपेक्षीत आहे.

 

सन 2026-27 या वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑनलाईनद्रवारे भरण्यात येत आहे. यापुर्वी दिलेल्या विहित मुदतीमध्ये ज्या पात्र विद्यार्थ्यानी अदयापपर्यत ऑनलाईनद्ववारे अर्ज केलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org/ या पोर्टलवर दिनांक 31 जुलै,2026 पर्यत ऑनलाईनद्ववारे अर्ज भरावेत.

जर गुणवत्तेनुसार किंवा जागे अभावी विद्यार्थ्याला शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, तरच त्याला स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करता येईल. जे विद्यार्थी वसतिगृह योजनेचा अर्ज भरणार नाहीत, त्यांना स्वाधार व वसतिगृह या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नाही. ज्या तालुक्यामध्ये शासकीय वसतिगृहे नाहीत, अशा तालुक्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सदर नियम शिथिल करण्यात आला आहे.

 

सन 2026-27 या वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज विद्यार्थ्यानी https://hmasnew.mahait.org/ या पोर्टलवर ऑनलाईनद्ववारे अर्ज भरावेत असे आवाहन डॉ. अनिता राठोड सहायक आयुक्त, समाजकल्याण,  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment