Friday, 17 July 2026

पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या जिल्हा नियोजन समितीची बैठक

 

पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या जिल्हा नियोजन समितीची बैठक

जालना, दि. 17 (जिमाका) : जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवार, 18 जुलै 2026 रोजी दुपारी 2.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.

बैठकीत 26 जानेवारी 2026 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त कायम करणे, त्या बैठकीतील निर्णयांच्या अंमलबजावणीचा अनुपालन अहवाल सादर करणे, तसेच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व ओटीएसपी) सन 2025-26 मधील खर्चास मान्यता देण्याबाबत विचारविनिमय करण्यात येणार आहे.

याशिवाय जून 2026 अखेर जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत झालेल्या खर्चाचा सविस्तर आढावा घेऊन विविध विकासकामांच्या प्रगतीचे परीक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विकास प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक बाबींवर चर्चा होणार असून, अध्यक्षांच्या मान्यतेने ऐनवेळच्या विषयांचाही समावेश करून त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीस लोकप्रतिनिधी, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment