जालना,दि.9 (जिमाका) :जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्तश्री.
गणेश चिमणकर, सहायक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कौशल्य सप्ताह (दि. 7 ते 15 जुलै 2026)अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्या वतीनेमुख्यमंत्री युवा
कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्ती आदेशांचे वितरण तसेच
उत्कृष्ट उद्योजक, कौशल्य प्रशिक्षण संस्था आणि युवकांना
प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या आस्थापनांचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्यामुख्यमंत्री युवा
कार्य प्रशिक्षण योजनेचाउद्देश सुशिक्षित युवक-युवतींना उद्योग व सेवा क्षेत्रात
प्रत्यक्ष कामाचा अनुभव देणे, त्यांचे व्यावसायिक कौशल्य विकसित करणे आणि भविष्यातील रोजगाराच्या
संधी अधिक सक्षम करणे हा आहे. या योजनेअंतर्गतवरकड हॉस्पिटल, जालना या
आस्थापनेने 6
प्रशिक्षणार्थ्यांनाप्रशिक्षणासाठी संधी उपलब्ध करून दिली असून, त्यांना नियुक्ती आदेशांचे
वितरणवरकड हॉस्पिटलचे प्रतिनिधी श्री. गौतम खरातवश्री. विशाल येवले, परि. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, जालनायांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कौशल्य विकास क्षेत्रात
उल्लेखनीय योगदान देणाऱ्या उत्कृष्ट उद्योजक,
गुणवत्तापूर्ण कौशल्य प्रशिक्षण संस्था तसेच मुख्यमंत्री युवा कार्य
प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध
करून देणाऱ्या आस्थापनांचा गौरव करण्यात आला. सन्मानित संस्थांमध्येप्रियदर्शनी
नागरी सहकारी बँक, जालना, समर्थ
सहकारी नागरी बँक मर्या., जालना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वस्तीगृह, जालना, भारत फायनान्स, जालना, आकाशदीप इन्स्टिट्यूट, जालनाआदी संस्थांचा समावेश होता.
कार्यक्रमात मार्गदर्शन करतानाश्री.
विशाल येवले, परि.
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, जालनायांनी
नियुक्ती प्राप्त प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन करत प्रशिक्षणाच्या कालावधीत शिस्त,
प्रामाणिकपणा, वेळेचे नियोजन आणि
समर्पित वृत्तीने कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच कौशल्य विकासासाठी सातत्याने
सहकार्य करणाऱ्या उद्योजक, प्रशिक्षण संस्था व
आस्थापनांचे आभार मानून भविष्यातही असेच सहकार्य लाभेल, अशी
अपेक्षा व्यक्त केली. या कर्याक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अमोल परिहार व रविंद्र
पाडमुख यांनी केले तर आभार दत्ता जाधव यांनी मानले.
या कार्यक्रमास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र, जालना येथील अमोल बोरकर, नितीन लोकडे, प्रदीप डोळे, कैलास
काळे, विशाल जगरवाल, दीपक पालवे,वश्री. गणेश सुपारकर इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.
-*-*-*-*-*-*-


No comments:
Post a Comment