Wednesday, 22 July 2026

प्रशासकीय इमारतीमध्ये नगर भुमापन कार्यालय कार्यरत

 


        जालना, दि.22 (जिमाका) :जालना शहरातील नगर भुमापन विषयक सेवा अधिक सुलभ व जलद उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जालना यांच्या अधिपत्याखाली नवीन नगर भूमापन कार्यालय, जालना येथे सुरु करण्यात आलेले आहे. हे कार्यालय  प्रशासकीय इमारत, तळ मजला, जालना येथे कार्यरत झाले आह. दि. 15 जुन, 2026 पासुन नागरिकांसाठी सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या कार्यालयामार्फत नगर भुमापन, मालमत्ता नोंदी, वारस हक्क नोंदी, नकाशे, मोजणी व इतर संबंधीत कामकाज करण्यात येणार आहेत. नागरिकांनी आपल्या नगर भूमापन विषयक कार्यासाठी प्रशासकीय इमारत, तळ मजला, जालना येथे सुरु झालेल्या नवीन नगर भूमापन जालना कार्यालयाशी संपर्क साधावा. मुळ गाव व शहरातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन नगर भूमापन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment