जालना,दि.9 (जिमाका) :परतुर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, दिनांक 28 नोव्हेंबर 2026 (शनिवार) साठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरले जात असुन जालना जिल्हयातील रहीवासी असलेल्या व इयत्ता पाचवी वर्गात सन 2026-27 मध्ये शिकत असणा-या विद्यार्थ्यांनी त्यांची नोंदणी सेवा केंद्रावरून व ईतर यंत्रणेचा वापर करून ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे सदर अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 अशी आहे.
तरी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी-2027 साठी च्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापुर्वी पाचवीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःची स्वाक्षरी, वडिलांची स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचा फोटो, जातीचे प्रमाणपत्र व आधारकार्ड सोबत असणे आवश्यक आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीची जाहीरात, माहीतीपत्रक, इ हे खालील दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. फॉर्म भरण्यासाठीचे प्रमाणपत्रे, फोटो, स्वाक्ष-या इ हे 10 ते 100 KB मध्ये स्कॅन करून संकेतस्थळ "www.navodaya.gov.in", व https://cbseitms.rcil.gov.in/nvs यावरून भरावेत. विद्यार्थ्यांचा जन्म हा दिनांक 1 मे 2015 ते 31 जुलै 2017 च्या दरम्यानचा असावा.जिल्हाभरातील सर्व मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस. जी. पवार यांनी केले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment