Wednesday, 8 July 2026

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्फे विविध कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


 

जालना,दि.8(जिमाका): महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्फे इतर मागासवर्गीयांच्या कल्याण व विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी खाली दर्शविण्यात आल्यानुसार उद्दिष्ट प्राप्त आहे.

20 टक्के बिजभांडवल एकुण 5 कर्ज प्रकरणे 2.5 लाखासाठी त्यावरील 2.50 लाखासाठी (त्यावरील 2.50 लाख ते 5 लाख), वैयक्तिक कर्ज व्याज परतावा 60 कर्ज प्रकरणे रु 90 लाखासाठी, गट कर्ज व्याज परतावा 5 कर्ज प्रकरणे रु. 7 लाखासाठी, थेट कर्ज योजना 30 कर्ज प्रकरणे रु. 30 लाखासाठी, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा 10 कर्ज प्रकरणे रु. 6 लाखासाठी, महिला स्वयंसिध्दी कर्ज व्याज परतावा 50 कर्ज प्रकरणे रु. 3 लाखासाठी.

इतर मागास वर्गीय प्रवर्गात मोडणाऱ्या आणि वय 18 ते 50 वर्ष  या दरम्यान असणाऱ्या गरजु इच्छुक लाभार्थींनी सन 2026-27 या वर्षासाठी ऑनलाईन वेब पोर्टल ॲड्रेस www.msobcfdc.org वर प्रकरणे दाखल करावेत. ऑनलाईन कर्ज प्रस्ताव दाखल केल्यानंतर संबंधीत लाभार्थींनी आवश्यक त्या झेरॉक्स प्रतीसह मुळ कागदपत्रेही तपासणीसाठी योजनेकरीता महामंडळाचे जिल्हा कार्यालय महाराष्ट्र राज्य मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्या भवन, दुसरा मजला येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. संपर्क क्रमांक 02482-223420

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment