Wednesday, 15 July 2026

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

 

जालना, दि.15 (जिमाका):  राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

पालकमंत्री श्रीमती मुंडे यांचे शनिवार, दि. 18 जुलै, 2026 रोजी दुपारी 1.50 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथे आगमन व राखीव. दुपारी 2.00 वाजता जालना जिल्हा वार्षिक नियोजन समिती व विविध शासकीय आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय, जालना  सायंकाळी 5.15 वाजता  छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment