Tuesday, 22 September 2026

कडधान्य प्रक्रिया केंद्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


 

        जालना, दि.22 (जिमाका) : जिल्ह्यातील शेतक-यांना कडधान्य विक्रीच्या मूल्यवर्धनास चालना देऊन शेतक-यांचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने काहीतरी पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कडधान्य प्रक्रिया युनिट (Mini Dal Pulses Mill, Semi-Automatic Pulses Dal Mill Fully Automatic Pulses/Dal Mill) स्थापन करण्यास अर्ज दि. 28 जानेवारी 2026 अखेरपर्यंत तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत प्रस्ताव या कार्यालयास सादर करण्यात यावे, सदर योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था (FPO), क्लस्टर स्तर महासंघ (CLF), प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), उद्योजक तसेच प्रक्रिया युनिट स्थापन करण्यास इच्छुक इतर पात्र व्यक्ती/संस्था यांना सहाय्य देऊन कडधान्य मूल्यसाखळी अधिक कार्यक्षम व सक्षम करणे हा मुख्य उद्देश आहे.

पात्र लाभार्थी घटक- योजनेअंतर्गत खालील घटकांना आर्थिक सहाय्य देण्यात येईल;शेतकरी उत्पादक संस्था (FPOS), क्लस्टर स्तर महासंघ (CLFs), प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), वैयक्तिक कोणत्याही अधिनियमांर्तगत

 

नोंदणीकृत इतर उपक्रम पात्रता निकष : गट लाभार्थी (FPO/Cluster Level Federation (CLFs) Primary Agricultural Credit Societies (PACS)-संबंधित संस्था किमान मागील दोन वर्षापासून विधिवत नोंदणीकृत व कार्यरत असावी. प्रकल्प खर्चाच्या किमान 15% रक्कम तसेच कार्यभांडवलासाठी आवश्यक मार्जिन मनी स्वतः उभारण्याची आर्थिक क्षमता असावी.

वैयक्तिक लाभार्थी

अर्जदाराचे वय किमान 21 वर्षे पूर्ण असावे. एका कुटुंबातील (स्वतः, पती/पत्नी व अविवाहित मुले) केवळ एका व्यक्तीस आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात येईल. प्रकल्प खर्चाच्या किमान 15% रक्कम तसेच कार्यभांडवलासाठी आवश्यक मार्जिन मनी स्वतः उभारण्याची आर्थिक क्षमता असावी

अनुसूचित जाती/जमाती, महिला, डोंगराळ क्षेत्रे व आकांक्षी जिल्हे यांना प्राधान्य असेल.

अर्थसहाय्य प्रमाण प्रकल्प खर्चाच्या 33% किया कमाल रु. 25 लाख प्रति युनिट (यापैकी जे कमी असेल ते). अनुदान केवळ यंत्रसामग्री (Plant & Machinery) खरेदी तसेच इमारत/गोदाम/साठवण पायाभूत सुविधा बांधकामासाठी दिले जाईल. जमीन, वीज, मनुष्यबळ इत्यादी खर्चासाठी अनुदान देव राहणार नाही. तसेच, इमारत/गोदाम/साठवण पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी अनुदानाचा जास्तीत जास्त हिस्सा एकूण पात्र अनुदानाच्या 30% पर्यंत असेल (म्हणजे प्रकल्प खर्चाच्या 33% किवा 25 लाख, यापैकी जे कमी असेल ते). सदर सहाय्य हे अनुदान स्वरूपात असून उर्वरित रक्कम अर्जदाराने मार्जिन मनी/बैंक कर्जाद्वारे उभारणे आवश्यक राहील.

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थी यांनी आपलेतालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कार्यवाही करण्यात यावी. असे आवाहन जि. आर. कापसे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

 

 

 

 

 

Monday, 21 September 2026

गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद

 



 

अंबड येथील श्री छत्रपती गणेश मंडळ आणि पारनेर येथील रामराज्य प्रतिष्ठान गणेश मंडळ येथे लोकसंवाद संपन्न

 

जालना,दि.21(जिमाका) :राज्य शासनामार्फत 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या अंतर्गतच महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत शासकीय योजना आणि उपक्रमांची माहिती पोहोचविणे हा या ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमाचा उद्देश आहे.

 

गणेशोत्सवाचे निमित्ताने आज दि. 21 सप्टेंबर रोजी अंबड येथील छत्रपती शिवाजी महाराज हाउसिंग सोसायटी हाऊसिंग सोसायटीतील श्री छत्रपती गणेश मंडळ आणि अंबड तालुक्यातील पारनेर येथील रामराज्य प्रतिष्ठान गणेश मंडळ येथे आज लोकसंवाद-2026 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्य, पशुसंवर्धन आणि महिला बाल विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांनी देण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी डी. एस. बोराडे यांनी यावेळी आरोग्य विभागातील योजनांची माहिती दिली. तर महिला बाल विकास विभागाचे जिल्हा प्रकल्प समन्वय संतोष दाभाडे व जिल्हा समन्वयक आकाश भवर, तसेच पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस यु तांगडे यांनी माहिती दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कुणाल जाधव, मंजीत रामभाऊ गाडेकर यांच्यासह या कार्यक्रमास नागरिकांची उपस्थिती होती. सदरील लोकसंवाद कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला तसेच नागरिकांच्या शंका निराकरण करण्यात आले.

 

****

जालन्यात २० क्विंटल तांदूळ जप्त; काळ्या बाजारात विक्रीचा संशय




जालना,दि.21(जिमाका) : जालना शहरातील औरंगाबाद चौफुली परिसरात लेकवूड हॉटेलच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडवर छापा टाकून सुमारे २० क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या तांदळाची अंदाजे किंमत ८० हजार रुपये आहे. सदर धान्य काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे २० सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये ५० किलो वजनाचे एकूण ४५ तांदळाचे कट्टे आढळून आले. या तांदळाचे एकूण वजन अंदाजे २० क्विंटल असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संशयावरून सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हाधिकारी आशीमा मित्तल, जिल्हा पुरवठा अधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महेश थेरे, पुरवठा निरीक्षक, तहसील कार्यालय जालना आणि जिल्हा पुरवठा कार्यालयातील तहसीलदार सचिन यादव तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या पथकाने केली.

या प्रकरणी तहसील कार्यालयातील निरीक्षण अधिकारी (पुरवठा) महेश थेरे यांच्या तक्रारीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये गुन्हा क्रमांक ०५२४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सदाशिव विनायक राठोड करीत आहेत.

 

****

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी घेतला जालना जिल्ह्यातील पाणीटंचाई व चारा उपलब्धतेचा दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा



 

पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी व चारा नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य द्या

जालना पालकमंत्री पंकजाताई मुंडे

 

- जिल्ह्यातील सर्व जलस्रोतांचे लेखापरीक्षण करावे

- चारा उपलब्धतेसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करा

 

जालना,दि.21(जिमाका) : जालना जिल्ह्यातील सर्व जलस्रोतांची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा आणि संभाव्य वापराचे तातडीने लेखापरीक्षण करून पुढील ऑगस्टपर्यंतचा पाणीपुरवठा आराखडा तयार करावा. नागरिकांसह पशुधनासाठी पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी दिले.

 

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे जालना जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि चारा उपलब्धतेचा आढावा घेतला. यावेळी जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवारिया, अप्पर जिल्‍हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जालना जिल्ह्यातील धरणे, तलाव, विहिरी, लघुपाटबंधारे आणि अन्य नैसर्गिक जलस्रोतांतील पाणीसाठ्याचे लेखापरीक्षण पुढील बैठकीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना दिले.

जायकवाडी प्रकल्पातून होणाऱ्या उचल पाणीपुरवठ्याची स्थिती आणि अंबड व जालना शहरांना उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा कालावधी यांचा अचूक अंदाज घ्यावा. सध्याचा पाणीसाठा मार्चपर्यंत पुरण्याची शक्यता असली, तरी पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी उपलब्ध न झाल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा विचार करून पर्यायी नियोजन करावे, असे पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी स्पष्ट केले.

 

पालकमंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, महानगरपालिका, नगरपंचायती, मोठ्या ग्रामपंचायती तसेच दुर्गम व डोंगराळ गावांसाठी पिण्याच्या पाण्याचे स्रोत आतापासून निश्चित करावेत. या स्रोतांतील पाणीसाठ्याचे नियमित निरीक्षण करून आवश्यकतेनुसार पर्यायी स्रोत तयार ठेवावेत. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी शेती, उद्योग, मोठी बांधकामे आणि अन्य पाणीखाऊ वापरांचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजनांचा प्रस्ताव तयार करावा.

 

टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा पारदर्शक आणि परिणामकारक ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. प्रत्येक टँकरला जीपीएस प्रणाली जोडून पाणी प्रत्यक्ष गरजू नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याची खात्री करावी, असे पालकमंत्री मुंडे यांनी सांगितले.

 

- चारा उपलब्धतेसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करा

जालना जिल्ह्यातील पशुधनाची संख्या, उपलब्ध चारा आणि संभाव्य तूट यांचा समावेश असलेला स्वतंत्र चारा कृती आराखडा तयार करावा. चारा डेपो अथवा चारा छावण्यांची आवश्यकता, जिल्ह्याची चारा स्वयंपूर्णता आणि अतिरिक्त चारा मिळविण्याचे स्रोत निश्चित करावेत. शेजारील जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून तेथील चारा उपलब्धतेचा अभ्यास करावा, असेही त्यांनी निर्देशित केले.

 

पाणी उपलब्ध असलेल्या भागांतील शेतकऱ्यांना चारा पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहित करावे. गाळपेरा क्षेत्रांचा चारा उत्पादनासाठी उपयोग करण्याची व्यवहार्यता तपासून त्याबाबतचा निर्णय प्रस्ताव तयार करावा. चारा छावण्या अथवा अन्य उपायांसाठी राज्यस्तरीय निर्णय आणि निधीची आवश्यकता असल्यास शासनाकडे तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे पालकमंत्री पालकमंत्री मुंडे यांनी सांगितले.

 

पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी आणि चारा या विषयांवर केंद्रित स्वतंत्र बैठक २८ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. या बैठकीसाठी जलस्रोतांचे लेखापरीक्षण, चारा नियोजन, संभाव्य पाणीटंचाईची गावे आणि आवश्यक उपाययोजनांची सविस्तर माहिती तयार ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री मुंडे यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, सर्व जलस्रोतांचे लेखापरीक्षण करून संभाव्य पाणीटंचाईची ठिकाणे निश्चित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात येईल. तसेच पिण्याचे पाणी व चारा उपलब्धतेवर विशेष लक्ष केंद्रित करून शेजारील जिल्ह्यांशी समन्वय साधण्यात येईल. जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक पूर्वनियोजन करून उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यातील सर्व पाण्याचे स्त्रोत शोधून त्यांची उपलब्धता व सद्यःस्थितीची माहिती संकलित करून ठेवावी. तसेच, पिक कापणी प्रयोगाच्या आधारेच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी पिक कापणी प्रयोग गांभीर्याने व अचूकपणे पूर्ण करावेत. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी टंचाईसंदर्भात बैठक घेऊन आवश्यक त्या उपाययोजनांचे पूर्वनियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

 

 

****

 

Sunday, 20 September 2026

गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘लोकसंवाद-2026’; शासकीय योजनांची नागरिकांना माहिती

 



 

 

 

जालना, दि.20(जिमाका)  : राज्य शासनाच्या वतीने 17 सप्टेंबर ते 17ऑक्टोबर 2026 या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम तसेच धोरणात्मक निर्णयांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने राज्यभर ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

या उपक्रमाचा मुख्य उद्देश गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, उपक्रम आणि विभागीय कार्यक्रमांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा आहे. त्याच अनुषंगाने आज दि. २० सप्टेंबर रोजी बदनापूर तालुक्यातील फुलेनगर येथील भोलेश्वर युवा प्रतिष्ठान गणेश मंडळाच्या ठिकाणी ‘लोकसंवाद-२०२६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

या कार्यक्रमात आरोग्य, कृषी तसेच महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची नागरिकांना माहिती देण्यात आली. आरोग्य विभागाच्या विविध योजना, नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या आरोग्यविषयक सुविधा आणि शासनाच्या आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी डी. एस. बोराडे यांनी दिली.

 

तसेच महिला व बाल विकास विभागाचे अंमलबजावणी सहाय्यक अधिकारी बी. बी. राठोड यांनी महिला व बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती उपस्थित नागरिकांना दिली. यावेळी नागरिकांनी विविध योजनांबाबत प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन करून योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती दिली.

 

गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासन आणि नागरिक यांच्यात थेट संवादाचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याने या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शासनाच्या योजना आणि उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच त्यांच्या अडचणी व शंकांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी दिसून आले.

 

कार्यक्रमास भोलेश्वर युवा प्रतिष्ठान गणेश मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर सुधाकर खैरे यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या सहभागामुळे कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

-*-*-*-*-*-*-

Saturday, 19 September 2026

जालना : लोकसंवादाच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती

 



 

जालना,दि.19(जिमाका) : राज्य शासनामार्फत 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या अंतर्गतच महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत शासकीय योजना आणि उपक्रमांची माहिती पोहोचविणे हा या ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमाचा उद्देश आहे.

 

गणेशोत्सवाचे निमित्ताने आज दि. 19 सप्टेंबर रोजी जालना तालूक्यातील शिवशक्ती गणेश मित्र मंडळ, चंदनझिरा येथे लोकसंवाद-2026 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्य, कृषी आणि महिला बाल विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांनी देण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी डी. एस. बोराडे यांनी यावेळी आरोग्य विभागातील योजनांची माहिती दिली. तर महिला बाल विकास विभागाचे अंमलबजावणी सहाय्यक अधिकारी बी.बी. राठोड, यांनी दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल निलक यांच्यासह या कार्यक्रमास नागरिकांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-

Friday, 18 September 2026

जालना : लोकसंवादाच्या माध्यमातून नागरीकांना शासकीय योजनांची माहिती


 

जालना,दि.18(जिमाका) : राज्य शासनामार्फत 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या अंतर्गतच महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत शासकीय योजना आणि उपक्रमांची माहिती पोहोचविणे हा या ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमाचा उद्देश आहे.

 

गणेशोत्सवाचे निमित्ताने आज दि. 18 सप्टेंबर रोजी जालना तालूक्यातील वडारवाडीचा राजा जय बजरंग गणेश मित्र मंडळ येथे लोकसंवाद-2026 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्य, कृषी आणि महिला बाल विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांनी देण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी डी. एस. बोराडे यांनी यावेळी आरोग्य विभागातील योजनांची माहिती दिली. तर महिला बाल विकास विभागाचे अंमलबजावणी सहाय्यक अधिकारी बी.बी. राठोड, यांनी दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विशाल शंकर पवार यांच्यासह या कार्यक्रमास नागरिकांची उपस्थिती होती.

 

****