Monday, 15 June 2026

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


 

जालना,दि.15(जिमाका): महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय जालना येथे सन-2026-27 या आर्थिक वर्षाकरीता अनुदान योजनेअंतर्गत 15 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट असून बीज भांडवल योजनेअंतर्गत -15 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट आहे. अनुसुचित जाती व नवबौध्द समाजातील इच्छुक अर्जदाराने सदरील योजनेचा लाभ घेण्याकरिता माहे-ऑगस्ट-2026 अखेरपर्यंत ऑनलाईन पध्दतीने http://mahadisha.mpbedc.in या वेबसाईटवर अर्ज सादर करावा.

या योजनेचा लाभ घेण्याकरीता इच्छुक अर्जदाराने खालील कागदपत्रांच्या छायांकित प्रती 2 प्रतींसह अर्ज सादर करावेत. यामध्ये जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला,  रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड,  कोटेशन, प्रकल्प अहवाल, व्यवसाय जागेचा पुरावा, 2 पासपोर्ट साईज फोटो, व्यवसायाचे लायसन्स इत्यादी आवश्यक आहे. तसेच कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक ए.बी. बळी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment