Monday, 15 June 2026

शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

 


 

जालना,दि.15(जिमाका): समाज कल्याण विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह जालना, भोकरदन, अंबड, बदनापुर, घनसावंगी, संत रामदास शासकीय वसतिगृह, जालना व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, जालना, अंबड, मंठा, भोकरदन या शासकीय वसतिगृहामध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देण्यात येत आहेत. त्यामुळे गरजु व पात्र विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. शालेय विद्यार्थ्यांनी दिनांक 30 जुन, 2026 रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल. तर इयत्ता 11 वी आणि बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी दिनांक 15 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. सन 2026-27 साठी खालील प्रमाणे वसतिगृहामध्ये रिक्त जागा आहेत.

यामध्ये संत रामदास शासकीय वसतिगृह, जालना, मान्य संख्या 75 असुन रिक्त जागा 30 आहेत. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, जालना मान्य संख्या 75 रिक्त जागा 24, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, जालना मान्य संख्या 80 रिक्त जागा 20, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, घनसावंगी मान्य संख्या 100 रिक्त जागा 38, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, अंबड मान्य संख्या 75 रिक्त जागा 20, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, अंबड मान्य संख्या 75 रिक्त जागा 21, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, भोकरदन मान्य संख्या 75 रिक्त जागा 32, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह भोकरदन मान्य संख्या 100 रिक्त जागा 33, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, बदनापुर मान्य संख्या  100रिक्त जागा 31, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, मंठा मान्य संख्या 100 रिक्त जागा 33 असे एकुण 855 मान्य संख्या असुन 282 रिक्त जागा आहेत.

यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, अनाथ, दिव्यांग, इतर मागासवर्गीय, विशेष मागासप्रवर्गसह इतर प्रवर्गाच्या इयत्ता आठवी, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर विनामुल्य प्रवेश ऑनलाईन पध्दतीने गुणवत्तेनुसार देण्यात येणार आहे. जर गुणवत्तेनुसार किंवा जागेअभावी विद्यार्थ्याला शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, तरच त्याला "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनचा अर्ज सादर करता येईल. जे विद्यार्थी वसतिगृह योजनेचा अर्ज भरणार नाहीत त्यांना "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व वसतिगृह दोन्ही योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या तालुक्यामध्ये शासकीय वसतिगृहे नाहीत अशा तालुक्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यासाठी सदर नियम शिथील केला आहे.

शासकीय वसतिगृहात विनामुल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम व इंटरनेट वाय-फाय इत्यादी सुविधा विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येतात. तरी गरजु विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे अर्ज करण्यासाठी https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे  केले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment