जालना, दि.24 (जिमाका): वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाअंतर्गत
राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याकरिता इच्छुकांनी https://vnvjntdc.org/
या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार, राजे
उमाजी नाईक, परमपुज्य गंगानाथ महाराज, ब्रम्हलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी,
श्रीकृष्ण आणि विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) अंतर्गत बीज भांडवल कर्ज
योजना, एक लाख रूपये थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज
व्याज परतावा योजना राबवून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो. व्याज परतावा
योजनेत संपूर्ण कर्ज बँकेचे राहणार आहे. तथापि कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास
कमाल 12 टक्क्यापर्यंतचे व्याज लाभार्थीचा बँक खात्यावर महामंडळाच्यावतीने जमा
करण्यात येणार आहे. एक लाख थेट कर्ज योजनेमध्ये संपूर्ण कर्ज महामंडळाकडून दिले
जाणार आहे. लाभार्थीने 2 हजार 85 रुपायांचा नियमितपणे 48 समान मासिक हप्त्यामध्ये
परतफेड केल्यास लाभार्थ्यांना व्याज अदा करावे लागणार नाही, परंतु थकित हप्त्यांवर
दर साल दर शेकडा 4 टक्के व्याजदर आकारण्यात येईल. अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या
जमाती विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत अ, पहिला
मजला, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना 431203. तसेच कार्यालयाच्या 02482-224790
या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. आर. बडगुजर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
केले आहे.
-*-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment