Wednesday, 3 June 2026

अनुसुचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, बदनापूर येथे शैक्षणिक वर्ष सन 2026-27 प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


जालना,दि.3(जिमाका):  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहायक आयुक्त, समाजकल्याण अधिनस्त असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, बदनापूर जि. जालना येथील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना  खालील प्रवर्गानुसार रिक्त जागा राखीव आहेत.

            प्रवर्ग एससी 80 टक्के, जागा 46, प्रवर्ग एसटी 10 टक्के जागा 16, प्रवर्ग व्हीजेएनटी 5 टक्के जागा 2, प्रवर्ग एसबीसी 2 टक्के जागा 5, प्रवर्ग पीएच 3 टक्के जागा 5, एकुण 74 जागा  

 इयत्ता 6 वी साठी 40 जागा व 7 वी ते 10 वी वर्गामध्ये रिक्त असेल्या संवर्गानुसार रिकत जागेसाठी प्रवेश पात्र 6 वी ते 10 मध्ये शिक्षण घेत असलेल्या सेमी इंग्रजी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दि. 20 जुन 2026 पर्यंत मुख्याध्यापक, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, बदनापूर यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन द्यावेत, त्यांनतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. जालना जिल्ह्यातील वरील प्रवर्गातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन सहायक आयुक्त अनिता राठोड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.  

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment